ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रूपामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, सरकार सतर्क आहे : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२१: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा
VUI-202012/01 हा नवीन स्ट्रॅन आढळून आला आहे. हा अत्यंत संसर्गित असल्याचे
बोलले जात आहे. यामुळे अनेक देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या फ्लाइट्स आधीच बंद
केल्या आहेत. मात्र कोरोनाच्या या नवीन स्ट्रॅनला घाबरण्याची गरज नाही,
सरकार याबाबत सतर्क आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले
आहे.

व्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते

व्हायरसमध्ये
सतत म्यूटेशन होत असते, म्हणजे याचे गुण बदलत असतात. म्यूटेशन होणारे
बहुतेक व्हायरस स्वतःच संपतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा अधिक पटीने
मजबूत आणि धोकादायक बनतात. ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की
वैज्ञानिकांना एक रूप समजेपर्यंत नवीन रूप समोर येत आहे. ब्रिटनमध्ये
सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू
शकते, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला होऊ शकते सुरुवात : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

भारतात
जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. जानेवारीच्या
कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत
आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, भारतात कदाचित कोरोना
महामारीचा सर्वात वाईट काळ संपला आहे. तसेच आठवड्याभरात भारत आपल्या
नागरिकांना लस देण्याच्या स्थितीत असेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!