
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, मुंबई, दि.७ : भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या विस्तव जात नसला तरी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे ऋृणानुबंध कायम असल्याचं एका भेटीनं दिसून आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची मुंबईत भेट घेतली.
मुंबईत मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन नितीन गडकरींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नितीन गडकरी यांनी जोशी सरांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. नितीन गडकरींच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
