स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 26, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि २६: ‘न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरतं..’, असं काहीसं निपाणीच्या सुप्रिया घाटगेनं सिध्द करुन दाखवलं आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षात भारतीय सैन्य दलात भरती होऊन सुप्रियाने निपाणीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. या तिच्या दैदिप्यमान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनात जिद्द असली की, कोणतही यश सहजरित्या पूर्ण करता येतं, असं सुप्रियाने वेळोवेळी करुन दाखवत इतर मुलींसमोर आदर्श निर्माण केला आहे. निपाणीत राहणाऱ्या मंगळवार पेठेतील घाटगे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने वडील रवींद्र घाटगे हे गवंडीकामासह हॉटेलमध्ये आचारी होते. वडिलांच्या कामावरतीच घाडगे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालायचा. ह्या सगळ्या परिस्थितीचा भार सोसतच सुप्रियाने घेतलेली फिनिक्स भरारी निश्चितच कौतुकास्पद मानली जात आहे.

सुप्रियाचे प्राथमिक शिक्षण मराठा मंडळ हायस्कूलमध्ये झाले. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तिथे दोन वर्षे एनसीसीमध्ये सहभाग घेतला. प्रारंभापासूनच सुप्रियाने सैन्यभरतीचे स्वप्न उराशी बाळगत प्रयत्न केले. यासाठी तिला देवचंद महाविद्यालयातील एनसीसी प्रमुख प्रा. डॉ. अशोक डोनर व कुटुंबीय, मित्र परिवाराने वेळोवेळी सहकार्य केले. आज भारतीय सैन्य दलात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांचा सहभाग देखील उल्लेखनिय असून त्यास ग्रामीण भागात देखील प्रतिसाद मिळत आहे. सैन्य दलात भरती होण्याचे महिलांचे प्रमाण वाढल्याने सर्वच भारतीयांसाठी ही आनंददायी बाब आहे, कारण यापूर्वी मुलींवरती ‘चूल आणि मूल’ इतकीच जबाबदारी असायची. मात्र, आता ती यापुढे जावून विविध क्षेत्रात आपला चोख ठसा उमटविताना दिसत आहे.

काम करणाऱ्या कुटुंबातील सुप्रिया रवींद्र घाटगे हिने दाखवून दिले आहे. सुप्रियाची बीएसएफमध्ये पोलिस म्हणून निवड झाली. अशी भरती होणारी सुप्रिया ही निपाणी शहरातील पहिलीच युवती आहे. हे करतानाही बारावी आणि बीएससीत चांगले गुण मिळवले. दरम्यान, वडिलांचा हृदयविकाराने आकस्मिक मृत्यू झाल्याने कुटुंबाची जबाबदारी आई अर्चना यांच्यावर पडली. घरातील कर्ती व्यक्ती निघून गेल्याने न डगमगता आईने पापड केंद्रात काम करून मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत अवर्णनीय आहे. सुप्रियाचा भाऊ सुशांत उच्चशिक्षित झाला आहे. ह्या सर्व परिस्थितीचा सुप्रियाने धिटाईने सामना करुन आपल्या ध्येयापर्यंत गरुड झेप घेण्यात ती यशस्वी झाली आहे. वडिलांच्या निधनानेही खचून न जाता सुप्रियाने उमेदीला कधीच हारु दिले नाही. ती सतत प्रयत्न करत राहिली आणि ती जिंकली सुध्दा!

सुप्रियाच्या वाटेत अनेक अडथळे आले; पण ती कधीच डगमगली नाही. तिने अनेक संकटांचा प्रकर्षाने सामना केला. दररोज सकाळी उठून व्यायामापासून ते घरच्या स्वयंपाकापर्यंत तिने सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पडल्या. हे सगळं करत असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, तिने भरतीचा नाद कधीच सोडला नाही, ती सततच्या प्रयत्नात यशस्वीच होत राहिली आणि तिने जीवनातील हरेक मैदान फतेह करत गेली.

माझ्या यशात माझ्या कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे, खास करुन माझ्या आईचा!, जिच्यामुळे मी सैन्य दलाची रेस जिंकू शकले. सैन्य भरतीचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता, त्यात मी यशस्वी झाले. मला निश्चित खूप अभिमान आणि तितकाच आनंदही वाटत आहे. माझे तरुणींना एकच सांगणे असेल, त्यांनी देखील भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज व्हावे.
-सुप्रिया घाटगे, निपाणी

सध्याच्या कलियुगात मानवी दृषकृत्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. असे भितीदायक वातावरण असतानाही जे या भितीची झळ सामान्य माणसाला लागू देत नाहीत असे आपल्या देशाचे सैनिक दिवस-रात्र मातृभूमीच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यात आता महिला देखील हिरिरीने सहभाही होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आमचे देवचंद काॅलेजच्या माध्यमातून महिलांच्या सैन्य भरतीसाठी नेहमीच प्राधान्य आहे. सुप्रियाने केलेल्या कामगिरीचा खूपच अभिमान आहे, तीने संपादन केलेले यश इतर मुलींसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे.
-प्रा. डॉ. अशोक डोनर, देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, निपाणी


ADVERTISEMENT
Previous Post

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

Next Post

आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

Next Post

आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021

सुरूर येथे एकावर जीवघेणा हल्ला

March 3, 2021

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकावून दोघांचा पोबारा 

March 3, 2021

वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार

March 3, 2021

फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरु करावे: आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेत मागणी

March 3, 2021

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.