
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, वडूज, दि. ६ : निमसोड गावामध्ये निमसोड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निमसोड गावाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन युवानेते रणजितसिंह देशमुख यांनी केले.
निमसोड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधा अंतर्गत मागासवर्गीय वस्ती ते पूर्व घाडगे मळा रस्ता डांबरीकरण (रुपये एकोणीस लाख रुपये फक्त) कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माण-खटाव मतदारसंघाचे युवानेते रणजितसिंह देशमुख बोलत होते. या वेळी अभिजीत देशमुख, मोहन देशमुख, सरपंच महेंद्र देशमुख, भिमराव घाडगे,अशोक एकनाथ घाडगे, दिगंबर देशमुख, पांडूरंग घाडगे, शिवाजी घाडगे, उत्तमराव घाडगे, बाळासाहेब घाडगे, भिकु घाडगे, विलासराव घाडगे, शंकर घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.



