
स्थैर्य, 1 फेब्रुवारी, सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक प्राप्त जनता सहकारी बँक लि., साताराच्यावतीने जनता बँक परिवारामधील नवनिर्वाचीत सातारा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, नगरसेवक जयवंत भोसले, सौ. सुजाता सागर राजेमहाडिक, सौ. सावित्री विजय बडेकर, सौ. विमल बाळासाहेब गोसावी, सौ. अपर्णा अविनाश बाचल, सौ. मुक्ता वसंत लेवे यांचा सत्कार बँकेच्या वतीने बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी केले.
याप्रसंगी बोलताना विनोद कुलकर्णी यांनी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवडून आले असून सातारा शहराच्या विकासासाठी व प्रगतीसाठी प्रयत्नशील राहतील त्याचप्रमाणे जनता सहकारी बँक परिवारातील निवडून आलेले नगरसेवक हे ही त्यांच्या प्रभागातील विकासाची कामे मार्गी लावतील. सातारा शहराचा कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी नवनिर्वाचीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पुष्पगुच्छ, शाल व पेढे देवून विनोद कुलकर्णी व संचालक सदस्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. बँकेचे चेअरमन व नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम झाला त्यामागे जनता सहकारी बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व सेवकांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सातारा या ऐतिहासिक नगरीत 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा विशेष सत्कार नगराध्यक्ष, बँकेचे चेअरमन अमोल मोहिते व संचालक सदस्यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, बाळासाहेब गोसावी, नगरसेविका सौ. विमल गोसावी, सौ. सावित्री बडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी बँकेचे संचालक माधव सारडा, रविंद्र माने, वजीर नदाफ, अॅड.. चंद्रकांत बेबले, तज्ञ संचालक राजेंद्र जाधव, सेवक संचालक निळकंठ सुर्ले, शिवाजीराव भोसले, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.

