नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ नोव्हेंबर 2021 । सातारा । भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम गावांतील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा यासाठी प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून नागरिकांनी या विशेष ग्रामसभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत – शिंदे यांनी केले आहे.

मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्येक विधानसभा मतदार संघात विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आहे.

दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभेत गावांतील सर्व नागरिकांनी मतदार यादी पहाण्यासाठी/तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील नोंदीबाबत नागरिकांनी काही हरकती असल्यास, नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास, नविन मतदारांना नाव नोंदणीसाठी विहीत अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याबाबत ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मृत मतदार व कायम स्थलांतरित मतदारांच्या नावे वगळणे, लग्न होवून बाहेर गेलेल्या महिलांची नावे वगळणे, लग्न होवून गावांत आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे, व 1 जानेवारी 2022  रोजी 18 वर्षे पुर्ण करणारे नवमतदार करण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे.

या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक व संबंधित गावांतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मागर्दशन करुन या कामासाठी गाव कामगार तलाठी यांना सहकार्य करतील. त्याचप्रमाणे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती, आक्षेप दुरुस्ती व नाव नोंदणी अर्ज एकत्र करुन ग्रामपंचायत कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे पाठवतील. तरी सर्व नागरिकांनी या विशेष ग्रामसभेचा लाभ घ्यावा.


Back to top button
Don`t copy text!