स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १३ : विमान प्रवाश्यांसाठी सरकारने एक नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना उड्डाण दरम्यान कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असेल. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांच्यानुसार जर प्रवासादरम्यान प्रवाश्यांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांना सुरक्षा यंत्रणेकडे सोपवले जाऊ शकते आणि इशाऱ्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाईल.
हे आहेत नवे नियम
- हवाई उड्डाणादरम्यान मास्क घालणे आवश्यक आहे आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवणे आवश्यक आहे. जर एखाद्या प्रवाश्याने मास्क लावला नाही तर त्यांना प्रवास करु दिला जाणार नाही.
- विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षा कर्मचारी हे सुनिश्चित करतील की मास्क घातल्याशिवाय कोणालाही विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी नाही. CASO आणि अन्य पर्यवेक्षण अधिकाऱ्यांना हे वैयक्तिकरित्या सुनिश्चित करावे लागेल.
- विमानतळ संचालक / टर्मिनल व्यवस्थापक हे सुनिश्चित करतील की प्रवासी विमानतळ आवारात योग्य प्रकारे मास्क घालत आहेत आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहेत की नाही.
- जर कोणत्याही प्रवाश्याने COVID – 19 प्रोटोकॉलचे पालन केले नाही, तर त्याला इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडे सोपवण्यात येईल. विमानात जर एखाद्या प्रवाशाने वारंवार इशारा देऊनही योग्य प्रकारे मास्क घातला नाही तर त्याला टेक-ऑफ पूर्वीच डी-बोर्ड करण्यात येईल.
- जर प्रवाशाने वारंवार इशारा देऊनही प्रोटोकॉलचे उल्लंघन केले तर प्रवाशाला अनियंत्रित प्रवाशी मानले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.
12 फेब्रुवारीला देशात आले नवीन प्रकरणे
देशात कोरोनाच्या नविन संक्रमितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी 24,845 नवीन संक्रमित आढळले आहेत. 19,972 बरे झाले आणि 140 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 4,730 ची वाढ झाली. सर्वात जास्त केस महाराष्ट्रात आढळल्या आहेत. यानंतर केरळ, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश आहेत.