
स्थैर्य, मुंबई, दि.१२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नव्या तारखांनुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा शनिवार दि. २७ मार्च २०२१ व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दि. ११ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या तारखांनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातच या परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तेव्हापासून विद्यार्थ्यांची दोलायमान स्थिती झाली होती. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.