दैनिक स्थैर्य | दि. १५ एप्रिल २०२४ | फलटण |
सभासदांच्या विश्वासास पात्र राहून श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थेने सातारा जिल्हयात यशस्वी व पारदर्शक कारभार करून एक वेगळा ठसा उमठविला आहे. संस्थेच्या सातारा जिल्हयात फलटण़, लोणंद, दहिवडी, म्हसवड, कोरेगाव, सातारा़, शिरवळ व वाई अशा एकूण आठ शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. सन २०२३-२४ या संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेची सभासदसंख्या ६५१० असून संस्थेस निव्वळ नफा रू. १ कोटी ५५ लाख इतका झाल्याची माहिती सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली.
सन २०२३-२४ चे आर्थिक वर्ष संपलेनंतर संचालक मंडळ यांच्यासमवेत संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. सहकारामध्ये आदर्श व पारदर्शक कामकाज केले असल्यामुळे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पतसंस्था नफ्याचे उद्दिष्ठ पूर्ण करू शकली, असे दिलीपसिंह भोसले यांनी नमूद केले. संस्थेची वार्षिक उलाढाल ७०३ कोटी ८९ लाख रूपये झालेली आहे. संस्थेचा स्वनिधी रूपये ८ कोटी ५९ लाख आहे. दिनांक ३१/०३/२०२४ अखेर संस्थेकडे रूपये ६७ कोटी ३९ लाख इतकी ठेव असून संस्थेने रूपये ५० कोटी ८२ लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे. गुंतवणूक रुपये ३० कोटी ९६ लाख आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये ३ कोटी ९६ लाख असून खेळते भागभांडवल रूपये ११३ कोटी ९७ लाख आहे.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले म्हणाले, संस्थेने सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे संस्थेचे ठेवीदार व कर्जदार यांनी चांगले सहकार्य केले आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून संस्थेने सभासदांना उत्त्तम सेवा दिलेली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच राबविलेली वसुली यंत्रणा, चांगले कर्जदार मिळणेसाठी केलेले प्रयत्न आणि सभासद व ठेवीदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्था नफ्यामध्ये आली आहे. संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासताना दर महिन्याच्या दुसर्या, तिसर्या व चौथ्या रविवारी के. के. डोळयांचे हॉस्पिटल, पुणे यांचेमार्फत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदूच्या तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. सभासदांसाठी आकर्षक दिनदर्शिकेचे वितरण केले जाते़ रक्तदान शिबीराचे आयोजन या उपक्रमामध्ये संस्थेचा महत्वपूर्ण सहभाग असतो. शहिद जवानांच्या कुटुंबियांना कृतज्ञता निधी कार्यक्रमामध्ये अग्रस्थानी सहभागी होऊन हातभार लावला जातो. दर महिन्याला सर्व शाखांमधून सेवासदन हॉस्पिटल, सांगली यांचेमार्फत डोळ्यांचे ऑपरेशन केले जाते. असे वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थेने सातारा जिल्हयात एक वेगळा नावलौकिक मिळविला आहे, असेही संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने संस्थेचे जनरल मॅनेजर, शाखाप्रमुख व सर्व सेवकांचे अभिनंदन केले.