
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 29 मे 2025। सातारा । जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले असून हे पथक कराड येथे दाखल झाले आहे.
एन.डी.आर.एफ. पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये दोन अधिकारी व जवान यांचा समावेश आहे. जलद आणि तात्काळ मदत पोहोचविणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा सातारा जिल्ह्याला उपयोग होणार आहे. एन. डी. आर. एफ. च्या पथकाकडे एकूण तीन बोटी त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत उपयोगी होणारे सर्व शोध व बचाव कार्य इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.
