
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । देहू येथील सोहळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी भाजपने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषण होऊ दिले नाही. या प्रकरणाचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने बुधवारी निषेध करण्यात आला. या निषेधाचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी मादळी सर देशमुख यांना सादर करण्यात आले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महिला शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे हा निषेध लेखी स्वरूपात नोंदवला. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाषण वगळण्यात आले. भाजपने हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर मध्ये पूजा करण्यापासून वारकर्यांनी रोखले होते. या प्रकरणाचा वाचवा काढण्यासाठीच हा प्रकार घडवून आणला गेला असा आमचा संशय आहे. असे प्रकार या सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीही खपवून घेतले जाणार नाही.
पंतप्रधान कार्यालय आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकुचित मनोवृत्तीचे आम्ही निषेध करत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन सादर करताना उषा शिंदे, मेघा नलावडे, पुजा काळे, नलिनी जाधव, रशिदा शेख इत्यादी महिला उपस्थित होत्या.