मलवडीचे राष्ट्रवादीचे सरपंच बाजीराव तरडे यांचा खासदार रणजितसिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२४ | फलटण |
मलवडीचे राष्ट्रवादीचे सरपंच बाजीराव तरडे यांचा व ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानदेव टकले व इतर सदस्य व सोसायटीचे चेअरमन नानासो बिचकुले व शशीकांत टकले सदस्य दादा कारंडे, हरिदास तरडे, आगतराव तरडे, राहुल गायकवाड, सतिश कारंडे, गणेश भोसले, दिपक तरडे ,किरण कारंडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला.

यावेळी युवा नेते धनंजयदादा साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, किसान मोर्चाचे अध्यक्ष जयवंत केजळे, तालुका सरचिटणीस संतोष सावंत उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मलवडी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. भविष्यात युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच युवकांसाठी लवकरच अद्यावत व्यायामशाळा उभारणार आहे. गावातील जमीन धोम-बलकवडीला गेली आहे; परंतु अद्याप शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

गावातील कार्यकर्त्यांनी आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी रामभाऊ नरूटे पाटील, धनाजी टकले, बबन रिटे, सचिन बरकडे, विनायक बरकडे, श्रीरंग बिचकुले, मारूती सूळ, राजेंद्र रूपनवर महाराज, अनिल तरटे, सचिन बरकडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!