राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


 

स्थैर्य, दि.१९: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असे अवाहन त्यांनी केले आहे.

रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यानंतर आता एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!