तालुक्यातील 8 विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा; विडणीतील विजयानंतर जल्लोष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 20 मार्च 2022 | फलटण | फलटण तालुक्यामधील विविध विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. विडणी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागल्यानंतर राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

फलटण तालुक्यातील सासवड, राजुरी, मठाचीवाडी, फरांदवाडी या विकास सोसायटीच्या निवडणूक ह्या बिनविरोध संपन्न झाल्या तर कुरवली खुर्द, गोखळी, पवारवाडी, विडणी येथे निवडणूक संपन्न झाली तर त्यामध्ये राष्ट्रवादीकाँग्रेस पुरस्कृत राजे गटाने विजय मिळवला.

फलटण तालुक्यात सर्वच ठिकाणी विजय मिळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.

विविध कार्यकारी सोसायटीमधील नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन हे विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!