नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द


स्थैर्य, मुंबई, दि. २०: नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने कोविड-१९ च्या उपचाराकरिता मुख्यमंत्री सहायता निधी साठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

आज मंत्रालयात नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे संचालक, अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी व कोरोनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर व इतर सर्व औषधांची मोठ्या प्रमाणात शासन उपाययोजना करीत आहे.

यापूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने ११ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

यावेळी संचालक शंकर पिंगळे, अध्यक्ष कैलास ताजणे, प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब भोर व इतर अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!