
स्थैर्य ,फलटण, दि, ०२: येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रीकी महाविद्यालयात ‘पोस्टर्स प्रेझेंटेशन स्पर्धा’ व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने दि.28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ या खुल्या स्पर्धेमध्ये सुमारे 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. निवृत्त कार्यकारी अभियंता उस्मान शेख यांच्या हस्ते पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व रोख रक्कम या स्वरुपात बक्षीस वितरण करण्यात आले. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीकांत फडतरे यांच्या हस्ते संपन्न झाले तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य मिलिंद नातू यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उस्मान शेख यांनी जागतिक तापमान वाढ व त्याचे दुष्परिणाम चित्रफीतींच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगीतले. प्रास्ताविक प्रा.शांताराम काळेल यांनी केले. प्रा.ताय्याप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.सोपान काळे यांनी आभार मानले.

