
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य ,फलटण, दि, ०२: गोखळी, ता.फलटण येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम 2021 अंतर्गत अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी गोखळी आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी शेख, आरोग्य कर्मचारी एस.एन.लोंढे, ए.आर.शिंदे, आशा वर्कर सौ.दुर्गा आडके यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व सांगितले.
