दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | गत दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आयोजित जाहीर मेळाव्यात त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यामध्ये कार्यकर्त्यांच्याकडून एकमुखी मागणी हि पवार साहेबांच्या सोबत जाण्याची आली. त्यानंतर श्रीमंत रामराजे यांनी पक्षातील वरिष्ठांशी बोलून व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपण पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे श्रीमंत रामराजे यांची नाराजी जाणून घेत त्यावर तोडगा काढणार असल्याच्या चर्चा ह्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.