मोफत चष्मा वाटप, नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहर भाजपच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ या ठिकाणी मोफत चष्मा वाटप, नेत्र तपासणी, मोफत मोंतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेकडो नेत्र रुग्णांनी उपचार घेतले व समाधान व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!