पुण्याच्या संकल्प फाउंडेशनमार्फत नसिर शिकलगार कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण: संकल्प युथ फौंडेशन पुणे तर्फे नसीर शिकलगार यांना कोविड योद्धा सन्मानप्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

नसीर इसाक शिकलगार हे लोकमत मध्ये गेली 20 वर्षे फलटण येथे पत्रकार म्हणून काम करीत आहेत कोरोना संकटाच्या काळात पडद्यामागून अनेक गरजू लोकांना आर्थिक साहाय्य केले,अन्नदानाचेही कार्य केले अनेक परप्रांतीयांना आधार देतानाच त्यांना मूळगावी पाठविण्यासाठी मदतही केली. गोर गरिबांना विविध माध्यमातून अन्नधान्याचे किट वाटप केले प्रसिद्धीपासून चार हात दूर राहून अनेकांना आधार दिला कोरोना काळात गोरगरिबांच्या समस्याही वृत्तपत्रातून मांडल्या.शासकीय अधिकारी यांच्याकडेही पाठपुरावा करून त्या सोडविल्याबद्दल संकल्प युथ फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष पवन गित्ते यांनी स्वत:हून दखल घेत त्यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविले याबद्दल नसीर शिकलगार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!