फलटण मेडिकल फौंडेशनची कंपोनंट लॅब सुरु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण: फलटण मेडीकल फौंडेशन संचलीत कंपोनंट लॅब नुकतीच कार्यान्वित झाली. यामुळे PCV, FFP, RDP मिळण्याची सोय फलटणातल्या फलटणात झाली आहे. हा मोठा प्रकल्प आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आपल्या आशिर्वादामुळे पुर्णत्वास गेला असल्याचे फलटण ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी फलटण मेडीकल फौंडेशन आपले आभारी असल्याचे सांगीतले.

या प्रसंगी अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी श्रीफळ वाढविले व कोषाध्यक्ष डॉ. द.ग.देशपांडे यांनी पूजन केले. फलटण मेडीकल फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत करवा,सचिव डॉ. संतोष गांधी,डॉ. सौ.पौर्णिमा जगताप,डॉ. सौ.सुरेखा दोशी,डॉ. सौ.सुनिता पोळ तसेच कंपनीचे चीफ इंजिनिअर संदिप कडू आणि रक्तपेढी व कंपोनंट लॅबचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

बर्‍याच दिवसांपासून कंपोनंट लॅबचे स्वप्न आज सत्यात उतरताना अनुभवताना होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. या लॅबची उभारणीपासून ते प्रत्यक्षात कामकाज सुरू होईपर्यंत आपण सर्वांनी म्हणजेच ब्लड बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, सभासद व टेक्निशियन, रक्त संक्रमण अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग तसेच सर्व रक्तदातार व अर्थ दातार या सर्वांचे डॉ. बिपीन शहा, डॉ. श्रीकांत करवा, डॉ. संतोष गांधी, डॉ. दत्तात्रय देशपांडे यांनी आभार मानले.  

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!