दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री नृसिंह चौकात असणार्या नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह उत्सव समितीतर्फे श्री नृसिंह जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात ध्वजपूजन करून करण्यात आली. मंगळवारी सकाळी श्रींना अभिषेक तसेच सायंकाळी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला.
बुधवार, दि. २२ मे रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी श्री नृसिंह दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नृसिंह क्रीडा मंडळाने केले आहे.