
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, औंध, दि.८: नांदोशीचे कोतवाल नारायण रामचंद्र शिरतोडे वय 46 यांचा गुरुवारी रात्री दुचाकी गाडी झाडाला धडकून जागीच मूत्यू झाला.
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, नारायण शिरतोडे हे गुरुवारी सायंकाळी तहसील कार्यालयातील शासकीय काम आटोपून औंध मार्गे नांदोशी या आपल्या गावी दुचाकी गाडीवरून निघाले होते रात्री सव्वा सातच्या
सुमारास त्यांची दुचाकी नांदोशीजवळील आंब्याच्या बागेजवळील झाडावर आदळून त्यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागल्याने त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मूत्यू झाला.
यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, सपोनि उत्तम भापकर ,महसूल ,पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळीभेट देऊन नारायण शिरतोडे यांच्या अपघाती मूत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले.
सदर घटनेची फिर्याद विनोद थोरात यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.अपघाताची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
