नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास ‘नॅक’चे मानांकन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली व राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बेंगलोर (नॅक) यांच्याकडून ‘ब’ मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे, अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) नवी दिल्ली व राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बेंगलोर (नॅक) आणि उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांना नॅक बेंगलोर यांच्याकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात नॅक मूल्यांकन प्रक्रिया जून २०२३ पासून सुरू होती.

ही मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊन नॅकच्या समितीने नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास ‘ब’ मानांकन पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले आहे. मूल्यांकन प्रक्रियेचे शेवटच्या टप्प्यात १६ मार्च २०२४ रोजी नॅकच्या समितीने भेट देऊन महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली व आपला अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद बेंगलोर या शिखर परिषदेकडे सादर केला होता.

या समितीच्या भेटीदरम्यान महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२२-२०२३’ मिळाल्याबद्दल नॅक समितीने श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अभिनंदन केले आहे.

नॅक मूल्यांकनासाठी नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांनी केलेल्या कामकाजाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके) तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन करून महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


Back to top button
Don`t copy text!