फलटण शहरातील सराईत गुंड हद्दपार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाण्यात २०२० पासून संजय ज्ञानदेव पवार (रा. दत्तनगर, फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात चोरी करणे, लोकसेवकास त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, दमदाटी करणे, महिलेचा विनयभंग उद्देशाने कृती करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, मारहाण करणे वगैरे गुन्हेगारी कृत्याबाबत गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाण्यामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने त्याची गुन्हेगारी सुरूच ठेवली होती. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे त्यास हद्दपार करण्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याने उपविभागीय दंडाधिकारी, फलटण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी गुंड संजय पवार यास संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथून दोन वर्षांकरीता हद्दपार केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, सपोफौ. संतोष कदम, पो.ह. बापूराव धायगुडे, सचिन जगताप, पो.शि. काकासोा कर्णे, स्वप्निल खराडे, सचिन पाटोळे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!