- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
स्थैर्य, नागठाणे, दि.९: केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात दिल्ली हरयाणा मधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंद ला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागठाणे व परिसरातल्या गावातील लोकांनी बंद मध्ये सहभाग घेतला.नागठाणे परिसरातील अतीत,बोरगाव, पाडळी,सासपडेसह परिसरातील छोट्या मोट्या गावांनी उस्फूर्तपणे बंद पाळला.तसेच हा बंद शांततेत पार पडला.नागठाणे येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बंद ला 100 टक्के प्रतिसाद देऊन दिवसभर दुकाने बंद केली.नागठाणे येथील मंगळवार आठवडी बाजाराचा दिवस असतानाही सर्व व्यहवार बंद होते.बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. डॉ सागर वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सर्व गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.