
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। फलटण । येथील नगरपरिषदेचे ज्येष्ठ अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक मुश्ताक अहमद अब्दुल लतीफ महात यांची निवडणूक आयोग मार्फत द्वारका येथे आयोजित केलेल्या मतदान केंद्रस्तरीत अधिकारी/पर्यवेक्षक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
मुश्ताक यांना कामगारदिनानिमित्त आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचे नगरपरिषदेतील कामकाज, राष्ट्रीय कामे, विविध प्रकारच्या जनजागृतीची कामे, कोरोना काळातील केलेली सेवा कौतुकास पात्र आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांनी त्यांची स्वच्छता निरीक्षक या पदावर 2024 मध्ये निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणास निवड झाल्यामुळे त्यांना मुख्याधिकारी निखिल मोरे, अधिकारी व कर्मचार्यांतर्फे शुभेच्छा देण्यात आला.
