मोर्वेत कोयत्याने वार करून युवकाचा खून


       

स्थैर्य, खंडाळा, दि.१: मोर्वे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत मंगळवारी युवकाचा लोखंडी अँगल व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापुर्वी एका युवकाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी त्याच्यावर कट रचून हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

याबाबत माहित अशी, दि. 1 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मोर्वे गावच्या हद्दीत एका किराणा मालाचे दुकानासमोर रस्त्यावर हेमंत काशीनाथ धायगुडे, काशीनाथ भगवान धायगुडे व शांताबाई काशीनाथ धायगुडे सर्व रा. मोर्वे यांनी आपसात संगनमत करुन मुलगा अंकुश याच्या खुनाचा बदला घेण्याचे उद्देशाने रविंद्र विलास बांदल वय 28 वर्षे (मोर्वे, ता. खंडाळा) यास मारहाण करत होते. हेमंत व काशीनाथ यांनी लोखंडी अँगल व कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यास सोडवणेसाठी गेलेल्या त्याच्या वडिलांच्या हातावर काशीनाथ याने कोयता मारुन तर शांताबाई हिने माझे पाय ओढुन जमिनीवर खाली पाडुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. यानंतर रविंद्र यास लोखंडी अंगल व कोयत्याने डोकीत मारहाण करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे मारले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!