नगरपालिकेकडुन रिंग रोड वरील लाईट शो बंद; स्ट्रीट लाईट सुरू; “स्थैर्य” बातमीचा परिणाम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 11 जुन 2024 | फलटण | फलटण शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या रिंग रोडवरील स्ट्रीट लाईट हे गेले काही दिवस चालू बंद अवस्थेत होते. रिंग रोड वरून जाताना लाईट शो सुरू असल्याचा अनुभव फलटणकरांना येत होता. याबाबतच “स्थैर्य” काल बातमी प्रकाशित केल्यानंतर आज तातडीने रिंग रोडवरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आलेल्या आहेत.

याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे म्हणाले की; रिंग रोड वरील अंडरग्राऊंड केबल फुटली (ब्रस्ट) झाली असल्याने तात्पुरता ओव्हर हेड वायर टाकून स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!