
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि.10 नोव्हेंबर : कोल्हापूर येथील न्यू कॉलेज येथे शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय पुरुष व महिला मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात मुधोजी महाविद्यालयातील गणेश काशीद याने रौप्यपदक मिळविले. या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री.शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी अभिनंदन केले.
