मुधोजी हायस्कूलची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बाजी; विभागस्तरीय स्पर्धेत धडक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा येथील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत विभागस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : सातारा येथील छत्रपती श्री शाहू स्टेडियमवर आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या यशामुळे संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सलग विजयांसह अंतिम सामन्यात वर्चस्व

स्पर्धेत मुधोजी हायस्कूलने पहिल्या सामन्यात वाई तालुक्याचा ३-० असा पराभव करत विजयी सुरुवात केली. अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात पाचगणी तालुक्याविरुद्ध ४-३ अशी मात करत संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात कराड तालुक्याचा ५-३ असा पराभव करत संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

मार्गदर्शन आणि अभिनंदन

संघाला जेष्ठ प्रशिक्षक संजय फडतरे व अमित काळे यांचे मार्गदर्शन लाभले, तर संकेत मठपती यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!