मुधोजी हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाची सलग दुसर्‍यांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील पहिला सामना इचलकरंजी म.न.पा. संघ विरुद्ध खेळण्यात आला. हा सामना ६-० ने जिंकून स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीचा सामना कोल्हापूर जिल्ह्याविरुद्ध झाला. हा सामना देखील ५-० ने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर म.न.पा. संघविरुद्ध झाला. हा सामना अत्यंत चुरशीने खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये निर्णय गोल संघाची सेंटर फॉरवर्ड कुमारी वेदिका वाघमोरे हिने नोंदवला व सलग दुसर्‍या वर्षी या वयोगटामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला.

या विजय संघामध्ये कुमारी सिद्धी केंजळे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्वसामन्यांमध्ये गोल नोंदवले व संघाची कर्णधारदेखील आहे. फॉरवर्ड लाईनमध्ये कुमारी श्रद्धा यादव, कुमारी गायत्री खरात, कुमारी अनघा केंजळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. हाफ लाईन व बॅक लाईन मध्ये कु. समृद्धी बनकर, कु. समृद्धी दगडे, कु. मानसी पवार, कु. मृण्मयी घोरपडे, कुमारी यांनीदेखील चांगली कामगिरी केली. गोलकीपर म्हणून कु. क्षितिजा बोडरे हिनेदेखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

या विजय संघाला सीनियर हॉकी मार्गदर्शक श्री. महेश खुटाळे सर, श्री. सचिन धुमाळ सर, क्रीडा शिक्षक श्री. खुरंगे बी.बी., व कु. धनश्री क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

या विजय संघास व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्रीडा मार्गदर्शकांना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार श्री. दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर, स्कूल कमिटीचे व्हा. चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य श्री शिरीष शरद कुमार दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, क्रीडा समितीचे सदस्य श्री. शिरीष वेलकर, श्री. महादेव माने, श्री. संजय फडतरे, श्री. तुषार मोहिते, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. तायप्पा शेडगे तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गंगवणे बी. एम., उपप्राचार्य श्री. ननवरे ए. वाय. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. देशमुख डी. एम., पर्यवेक्षक श्री. शिंदे व्ही.जी., बगाडे मॅडम, श्री. जाधव जी. ए., प्रशालेतील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षक तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री. सचिन लाळगे, सदस्य श्री. प्रवीण गाडे, श्री. महेंद्र जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!