```html
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
```

एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ पास; जाणून घ्या नियम आणि तिकीट दर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ योजना पर्यटकांसह नियमित प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. ७ दिवस अथवा ४ दिवसांचा पास काढून प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रात लालपरीने अमर्याद प्रवास करता येतो.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी ‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ ही विशेष पास योजना उपलब्ध केली आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना ४ दिवस किंवा ७ दिवसांचा पास काढून संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही प्रवास करण्याची मुभा मिळते. सलग सुट्ट्या, यात्रा आणि पर्यटन हंगामात प्रवाशांचा या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पासचे प्रकार आणि तिकीट दर

या योजनेमध्ये साधारण (लालपरी), रातराणी, जलद आणि शिवशाही बससेवेचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार ४ दिवस आणि ७ दिवसांचे पास उपलब्ध आहेत. प्रौढ आणि बालकांसाठी (५ ते १२ वर्षे) स्वतंत्र दरांची रचना करण्यात आली आहे.

महत्त्वाचे नियम आणि अटी

हा पास फक्त संबंधित व्यक्तीसाठीच लागू असतो. प्रवासादरम्यान अधिकृत ओळखपत्र बाळगणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण करायचे असल्यास आरक्षण शुल्क वेगळे द्यावे लागते. पासची मुदत संपल्यानंतर तो वाढवता येत नाही.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!