एसटी एनसीएमसी कार्ड टॉपअप ५ रुपयांवर; ५० रुपयांची अट रद्द

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डमध्ये आता किमान ५० रुपयांऐवजी केवळ ५ रुपयांचे टॉपअप करता येणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २७ नोव्हेंबर : एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, टॉपअपसाठी असलेली किमान ५० रुपयांची अट रद्द करून ती ५ रुपयांवर आणण्यात आली आहे. कमी अंतराचा प्रवास करणारे ग्रामीण भागातील प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारीपासून कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया राबवली जात आहे.

ग्रामीण प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ

ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी तिकीट दरासाठीही पूर्वी किमान ५० रुपये भरावे लागत होते, ज्यामुळे गैरसोय होत होती. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास मोफत असल्याने त्यांना प्रामुख्याने स्वच्छता अधिभारासाठीच रक्कम ठेवावी लागते; त्यामुळे केवळ अधिभारासाठी मोठी रक्कम अडकून राहू नये, हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.

१.४७ कोटी कार्डांची नोंदणी पूर्ण

एसटीच्या एनसीएमसी कार्ड नोंदणी मोहिमेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, २५ नोव्हेंबरपर्यंत १.४७ कोटी कार्डांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी १.३० कोटी कार्ड सक्रिय करण्यात आली असून, ५ रुपयांच्या टॉपअप सुविधेमुळे या प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!