
थेट WhatsApp वर मिळवा
एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी आणि सवलतधारक घटकांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता १ जानेवारी २०२७ पर्यंत हे कार्ड काढता येणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०६ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध सवलत प्राप्त प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी यापूर्वी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक प्रवाशांचे कार्ड अद्याप तयार न झाल्यामुळे निर्माण होणारी अडचण लक्षात घेता प्रशासनाने या मुदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन मुदतीमुळे प्रवाशांना दिलासा
एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार आता प्रवासी वर्ग आणि सवलतधारकांना १ जानेवारी २०२७ पर्यंत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढता येणार आहे. या मुदतवाढीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे.





