सौर कृषीपंपापासून वीजदर सवलतीपर्यंतच्या सर्व योजना डिजिटल; शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ थांबणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसह औद्योगिक ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, सौर कृषीपंप योजना, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांसाठीची वीजदर सवलत तसेच चार्जिंग व्यवस्था निर्मितीच्या योजना आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०६ नोव्हेंबर : सरकारी कामकाजाची पुनर्रचना (जीपीआर) उपक्रमांतर्गत प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेसाठी अर्ज करताना आता आधार कार्ड आणि महा-ॲग्री आयडीला प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे अर्जदाराची प्राथमिक माहिती आपोआप भरली जाईल.

ॲग्रीस्टॅक प्रणालीचा वापर

सातबारा उतारा आणि शेतीविषयक इतर माहिती आता ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीच्या माध्यमातून थेट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे अपलोड करण्याच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र व पारदर्शक पोर्टल विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!