
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असलेल्या सोने व चांदीचा वर्ख असलेल्या मिठाईच्या दर्जामध्ये फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कडक पावले उचलली आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. ०६ नोव्हेंबर : दिवाळी सणात सोन्या आणि चांदीचा वर्ख असलेल्या मिठाईला मोठी मागणी असते. मात्र, यामध्ये अनेकदा बनावट वर्ख किंवा आरोग्यास घातक साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अशा सर्व मिठाईच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
दर्जाबाबत तपासणी आणि ग्राहकांच्या तक्रारी
अमरावती जिल्ह्यात चोवीस हजार रुपये किलो दराने विकली जाणारी सोन्याच्या वर्खाची मिठाई मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. त्यानंतर ग्राहकांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे एफडीने राज्यभरात कारवाईचा बडगा उगारला आहे. चांदीचा वर्ख म्हणून काही ठिकाणी बनावट किंवा हानिकारक घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
व्यापाऱ्यांच्या दाव्यांवर प्रशासनाचा आक्षेप
सोन्याचा वर्ख खाणे आरोग्यासाठी घातक नसले तरी, सणाच्या तोंडावर मिठाई व्यावसायिक ग्राहकांची दिशाभूल करत आहेत. अनेकदा बोटाने घासल्यावर चांदीचा वर्ख गायब होतो किंवा त्याऐवजी कमी दर्जाच्या धातूचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एफडीमार्फत सर्व मिठाईच्या गुणवत्तेची कठोर तपासणी केली जाणार आहे.





