कु. भार्गवी नितीन चांडोले शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात नववी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 10 जानेवारी 2022 । फलटण । येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी साठी कु. भार्गवी नितीन चांडोले या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववा क्रमांक पटकावला आहे. तर रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे, वरद सागर लाखोळे व ओम दत्तात्रय काळे या सर्व विद्यार्थ्यांचे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष अभिनंदन केले.

यासोबतच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटशिक्षणाधिकारीअनिल संकपाळ, प्रशाशन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे यासोबतच विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!