
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि.11 नोव्हेंबर : झिरपवाडी ता.फलटण येथील उपसरपंच पदाच्या रिक्त जागी निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये राजे गटाच्या सौ.संगिता बापूराव काकडे यांची बिनविरोध निवड झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वर्षा बोरकर होत्या. सौ. संगिता काकडे यांचा एकमेव अर्ज दाखल केला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक अधिकारी नामदेव नाळे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी सरपंच महादेव गुंजवटे , बाजार समितीचे संचालक मोहनराव डांगे यांच्यासह राजे गटाच्या समर्थकांनी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
