
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। फलटण । कोळकी, ता. फलटण येथील भारतीय जनता पार्टीचे कोळकीचे नेते उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर यांच्या मातोश्री सौ. राजलक्ष्मी निंबाळकर यांना पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाची दुमुनी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथे महाराष्ट्रदिनी झालेल्या कार्यक्रमात सौ. राजलक्ष्मी निंबाळकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांच्या मातोश्री सौ. राजलक्ष्मी निंबाळकर या या कामात सक्रीय असतात.



