दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । सातारा । महाराष्ट्रातील गडकिल्ले भटकंती करणारा केरळचा युवक हमरास एम.के. यांचे साताऱ्यात शिवतीर्थ येथे स्वागत करण्यात आले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी हमरास याच्या स्वागतासाठी पुढाकार घेत हमरास यास सायकल भेट देण्यात येणार होती. त्यानुसार आज जलमंदिर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सायकल देण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या हस्ते सन्मान केला गेल्याने हमरास भावूक झाला होता.
केरळ येथील युवक हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत होवून सायकलवरुन गडकोटांना ३७० किल्ल्यांना भेट देत आहे. त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील ११७ किल्यांना भेट दिली असून ११८ किल्यावर भेट देणार आहे. गेले चार दिवस हमरास साताऱ्यात आहे साताऱ्यातील अजिंक्यतारा व सज्जनगड येथे त्याने भेट दिली. सातारकरानी त्याचे स्वागत करुन खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पुढाकार घेऊन हमरास यास सायकल भेट देण्याचा मानस केला होता आज जलमंदिर येथे खा उदयनराजे यांच्या हस्ते हमरास याला सायकल भेट दिली.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा .उदयनराजे यांनी त्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली भक्ती पाहून त्याचे कौतुक केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के तोफिक बागवान,राहुल गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते.