स्थैर्य, सातारा, दि.२४: श्री. राजन सिताराम कदम यांचे दि. २२/११/२०२० रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर संगम माहुली येथे नियमांचे पालन करुन दि. २३/११/२०२० ला अंत्यविधी करण्यात आली अंत्यविधीवेळी कदम कुटुंबाला सांत्वना देण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश बडेकर, अजित गुजर, संजय शिंदे व ईर्शाद बागवान, विविध शासकीय अधिकारी, समाजातील मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या आदेशाची 24 तासांत अंमलबजावणी; नेर तलावातून रब्बीसाठी सोडले पाणी
कै. राजन सिताराम कदम यांनी वालचंद कालेज आफ इंजिनियरींग, सांगली येथे BE Civil 1977 साली पुर्ण केले त्यानंतर ते 1977 साली ईरिगेशन डिपार्टमेंट ला शासकीय सेवेत रुजु झाले 2010 मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्मिता कदम, मुलगा मिलिंद कदम, सुन डॉ. रुपाली कदम, नातवंडे, विवाहित मुलगी सौ. मिनल यादव, जावई हिम्मत यादव तसेच बंधु डा. संजोग कदम, भाऊजय मा. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, पुतणे इंद्रजित, पुतणी श्रेया व तीन बहिणी असा परीवार आहे. उद्या दि. 25/11/2020 रोजी सकाळी 8ः30 मि. सावडणेचा विधी होणार आहे.
क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा