
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सोमवारी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्री. रवींद्र बेडकिहाळ यांनी पुन्हा एकदा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी ८५ वर्षांचे तरुण योद्धे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आगळ्यावेगळ्या शब्दात शुभेच्छा देऊन पुष्पगुच्छाने त्यांचे स्वागत केले.
साहेब आपल्यासारख्या ८५ वर्षांच्या तरुण योद्ध्याकडून आम्हासारख्या ८१ वर्षांच्या ज्येष्ठांना आपली आदर्श अशी दिव्य उर्जा मिळावी, अशी अपेक्षाही बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख युवक कार्यकर्ते तुषार नाईक निंबाळकर व फलटण तालुका संजय गांधी निराधार मदत योजना समितीचे अध्यक्ष बापू गावडे उपस्थित होते.
