स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवून कोरोना संशयित किंवा बाधित रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबर कोरोना प्रादुर्भावग्रस्त भागात योग्य पध्दतीने प्रबोधन करुन कोणत्याही परिस्थितीत कोरोना नियंत्रणात राहील यासाठी प्रयत्नशील असलेले अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती, संस्थांचा भारतीय जनता पार्टी व स्वराज फौंडेशन, फलटण यांच्यावतीने स्वराज कोविड योध्दा सन्मानपत्र देवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भाजप पदाधिकारी, स्वराज फौंडेशनचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे गटनेते अशोक जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. विष्णुपंत लोखंडे, स्वराज संघटनेचे अनिकेत कदम, विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, नितीन सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे (पवार), सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, सचिन राऊळ, लोणंद पोलीस ठाण्याचे संतोष चौधरी, पोलीस उपनिरिक्षक विशाल भंडारी, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अंशुमन धुमाळ, नगर परिषद रुग्णालयाच्या डॉ. शीतल सोनवलकरचा अधिकार्यांना स्वराज कोविड योध्दा सन्मानपत्र देवून खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.