स्थैर्य, फलटण : केंद्राच्या विविध योजनांवर देखरेख ठेवणारी दिशा समिती आहे. या समितीवर साताऱ्याचे ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सह-अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सह सचिव यश पाल यांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहे.
जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत विविध ५० वर योजना राबविल्या जातात. या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होतेय का हे पहाण्याचे काम दिशा समिती करते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यामातून केंद्राच्या सर्वाधिक योजना राबविल्या जातात. केंद्र सरकारच्या विविध योजनांवर देखरेख करणाऱ्या दिशा समितीवर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांची सह-अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे.