खा.रणजितदादा खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला


स्थैर्य, सातारा, दि.15 : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी जावून भेट घेतली.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. शिवाय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय डावपेचात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या पाठीशी उभे असतात. त्याच अनुषंगाने सदरची भेट झाली असल्याचे बोलले जात असून या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे, आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक याबाबत नक्कीच चर्चा झाली असणार. असा कयास जिल्ह्यातील राजकीय वर्तृळातून व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!