दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२४ | फलटण |
JEE/NEET/MH-CET साठी करिअर मार्गदर्शन आणि १० वी बोर्डात जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे, याबद्दल कोटा येथील मोशन अकॅडमी, जी निकालामध्ये देशात नंबर १ आहे तसेच श्री. देशमुख सर जे बोर्डाच्या परीक्षेची शिल्लक राहिलेल्या ४० दिवसात कशी परिणामकारक तयारी करता येईल, याविषयी माहिती देण्यासाठी बारामती येथे सुरू झालेल्या मोशन अकॅडमीतर्फे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी फलटणमध्ये करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित केले आहे.
हे सेमिनार दहावीनंतर करिअर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे सेमिनार ठरणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा फलटण शहर व तालुयातील विद्यार्थ्यांनी घेऊन जास्तीत जास्त संख्येने सेमिनारला उपस्थित राहावे, असे आवाहन मोशन अकॅडमी बारामती संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
हे सेमिनार शुक्रवार, दि. २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत अनंत मंगल कार्यालय, शिंगणापूर रोड, कोळकी, फलटण येथे होणार असून विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ८०५५ ९९० ९०१ किंवा ८०५५ ९९० ९०२ या फोन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मोशन अकॅडमी, १ ला मजला, ढाळे संघवी आयकॉन, सिटी-इन चौक, सूर्य नगरी, भिगवन रोड, बारामती यांच्याकडून करण्यात आले आहे.