अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सुमारे अडीच कोटीहुन अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग : तहसीलदार यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि. 12 : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांपैकी 7237 शेतकर्‍यांच्या 2466.47 हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाईचे 2 कोटी 64 लाख 30 हजार रुपये तसेच तालुक्यातील 282 कुटुंबांच्या राहत्या घरांच्या नुकसान भरपाईचे 16 लाख 44 हजार रुपये प्राप्त झाले असून सदर रक्कम संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.

सुमारे ५ कोटींचे नुकसान

फलटण तालुक्यात आक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 12070 शेतकर्‍यांच्या 3763.05 हेक्टर क्षेत्रातील 4 कोटी 95 लाख 50 हजार रुपये नुकसान झाले असून त्यापैकी फळबागा सोडून जिरायत पट्टयातील 881 शेतकर्‍यांच्या 99.36 हेक्टर बाजरी, 129.22 हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी 27.63 हेक्टर क्षेत्रातील कडधान्य 21.60 हेक्टर क्षेत्रातील सुर्यफूल असे एकुण 277.81. हेक्टर क्षेत्रातील पीकांचे 33 टक्क्यापेक्षा अधिक 18 लाख 89 हजार 100 रुपयांचे, फळबागा सोडून बागायत पट्टयातील 10853 शेतकर्‍यांच्या 396.9 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, 1352.79 हेक्टर क्षेत्रातील कांदा, 44.90 हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, 371.80 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला, 662.49 हेक्टर क्षेत्रातील मका 444.32 हेक्टर क्षेत्रातील ऊस 7.20 हेक्टर क्षेत्रातील झेंडू, 77.97 हेक्टर क्षेत्रातील कापूस अशा एकुण 3357.56 हेक्टर क्षेत्रातील पीकांचे 4 कोटी 53 लाख 27 हजार रुपयांचे, 336 शेतकर्‍यांच्या 51.08 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे, 67.65 हेक्टर क्षेत्रातील डाळींब, 0.40 हेक्टर क्षेत्रातील पेरु, 2.75 हेक्टर क्षेत्रातील पोपई, 6.50 हेक्टर क्षेत्रातील केळी, 1.30 हेक्टर क्षेत्रातील चिंच अशा एकुण 129.68 हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे 23 लाख 34200 रुपयांचे म्हणजे एकुण तालुक्यातील 12070 शेतकर्‍यांच्या 3765.05 हेक्टर क्षेत्रातील जिरायत, बागायत पीके व फळबागांचे 4 कोटी 95 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविले होते.

घर पडीच्या नुकसानी पोटी १६ लाख ४४ हजार जमा

तालुक्यातील 4 कोटी 95 लाख 50 हजार रुपये शेतीपीकांचे आणि 282 घरांच्या 16 लाख 44 हजार रुपये नुकसानीपैकी पहिल्या टप्प्यात 2 कोटी 64 लाख 30 हजार रुपये पीकांच्या नुकसानीचे आणि 16 लाख 44 हजार रुपये घरांच्या नुकसानीचे उपलब्ध झाले आहेत. सदरची संपूर्ण रक्कम संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून दुसर्‍या टप्प्यातील रक्कम उपलब्ध होताच ती संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार आर.सी.पाटील यांनी सांगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!