स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

एकरकमी गुंतवणूक किंवा एसआयपी : बिगिनर्ससाठी उत्तम पर्याय

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 14, 2021
in इतर

स्थैर्य, मुंबई, दि. १४: भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय क्षमतेच्या बाबतीत तसेच स्वप्नपूर्ती करण्यासाठी लवकर गुंतवणूक करण्याची उत्सुकता दाखवणारी देशातील मिलेनिअल्स आणि जेन झेड पिढीच्या बाबतीत संपूर्ण जग जागृत आहे. भांडवली बाजारात नवीन गुंतवणुकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. उत्तम इंटरनेट उपलब्धता आणि बाजाराबद्दल जागरूकतेमुळेच हे झाले. जास्तीत जास्त भारतीय सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) करत आहेत, तर म्युच्युअल फंडासारख्या एकरकमी गुंतवणूक करत आहे. उर्वरीत इतर लोक त्यांच्या पोर्टफोलिओची रचना करण्यासाठी गुंतवणुकीतील सर्वोत्तम संधीबद्दल मार्गदर्शनाच्या शोधात आहेत. सध्या बाजारात असंख्य पर्याय आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या पर्यायाबाबत खात्री नसल्यास बाजारातील आपला निर्णय चुकू शकतो.

या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना सदैव एकच प्रश्न असतो, कोणत्या साधनाद्वारे सुरुवात करायची? एकरकमी गुंतवणूक करायची की एसआयपी चांगला पर्याय आहे, हा संभ्रम अनेक गुंतवणूकदारांमध्ये आहे. अर्थातच, जी उद्दिष्टे गुंतवणूकदाराला साध्य करायची आहेत, त्यावर आधारीत हा निर्णय असल्याने यातील असंख्य घटकांनुसार तो घ्यावा लागतो असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय यांनी व्यक्त केले.

एकरकमी गुंतवणूक समजून घेताना: एखाद्या योजनेत नियमितपणे किंवा मासिक योगदान देण्याची खात्री नसलेले लोक सहजा म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करतात. कारण हा केवळ एक वेळचा व्यवहार आहे. अशा गुंतवणुकीसाठी बाजारात मोठे भांडवल गुंतवावे लागते, जेणेकरून मोठा परतावा मिळू शकेल.

ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नसते, ते असा पर्याय निवडतात. कारण ते बाजारपेठेकडे केवळ उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने पाहत असतात. यंत्रणेची गतिशीलता समजून घेण्यासाठी काही ज्ञान आ‌श्यक असते. निर्देशांक कमी अंकांवर व्यापार करत असेल, तेव्हा लोक एकरकमी पैसा फंडांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. ज्यांना जास्त परंतु अनियमित उत्पन्न मिळते, अशा गुंतवणुकदारांसाठी हा योग्य पर्याय मानला जातो. बिझनेस मॅनेज करण्यात आणि शुल्क अथवा करारांच्या रुपात पैसा मिळवणाऱ्या सल्लागारांसाठी हे पर्याय असून त्यांच्याच्याकरिता एसआयपी फायद्याचा नाही. कारण अशा प्रकारचे अनियमित चक्र एकरकमी गुंतवणुकीसाठी योग्य असतात.

एसआयपीचा पर्याय: एसआयपीचा विचार करता, गुंतवणूकदाराच्या खात्याची सरासरी क्षमता विचारात घेता, हे साधन वाढीव गुंतवणुकीच्या वाढीव प्रक्रिया कायम राखते. मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती ठराविक कालावधीत नियमितपणे एसआयपीत योगदान देण्याचा निर्णय घेऊ शकतात. ही दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आधारावर ५०० रुपयांपासून अनेक हजार रुपयांपर्यंत असू शकते. ही प्रक्रिया बँक सर्व्हिस घेण्यासारखीच आहे. जेथे, पूर्व नियोजित कालावधीसाठी साइन-अप केल्याने, लोकांना या सेवेसाठी किती योगदान द्यायचे हे माहिती असते. पहिल्या गुंतवणुकीपासून मालमत्ता मूल्य वेळोवेळी जमा होत राहते.

पहिल्यांदा गुंतवणूक करणारे बहुतांश तरुण व्यावसायिक आणि नुकतेच पदवीप्राप्त असतात, त्यांना एसआयपी हा चांगला पर्याय आहे. त्यांची गुंतवणूक कमी राहते आणि वित्तीय गरजांची पातळीही कमी असते. तसेच, बाजारातील चढ-उताराची चिंता न करता उद्देश आधारीत कालावधीनुसार, त्यांचे व्यवस्थापन करता येते. यासह, या योजनेत एसआयपीमधून मिळाणारे व्याज परत त्याच योजनेत लावण्याचे व्यवस्थापन करा. जेणेकरून गुंतवणुकदारांना अधिक चांगले परतावे मिळू शकतील.

गुंतवणूक करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे व ही प्रक्रिया कशी करावी?: यात आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, गुंतवणूकदाराने अनेक पर्यायांमधून एक पर्याय निवडण्यासाठी ठराविक उद्दिष्टे नियोजित करावी लागतात. उदा. गुंतवणूकदाराला किती भांडवल गुंतवण्याची इच्छा आहे, संबंधित व्यक्तीला मासिक कोणत्या स्वरुपाचे उत्पन्न मिळते, गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची सहनशीलता आणि बाजाराची गतिशीलता ठरवणारे इतर घटक यावर हे सर्व अवलंबून असते.

स्थिर उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी एसआयपी हा अप्रतिम पर्याय मानला जातो. त्यांना गुंतवणूकदार म्हणून निर्देशांकावर फार कमी लक्ष द्यावे लागते. ही नियमित उत्पन्न असलेल्या नवशिक्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. कारण ही कधीही थांबवता येते. तसेच, डिजिटल केवायसी आणि इतर साधनांद्वारे बँका ग्राहकांना मोबाइल अॅपद्वारे ही प्रक्रिया वेगाने होण्यास मदत करतात. आपण निवडलेल्या योजनेनुसार, यात पद्धतशीरपणे गुंतवणूक होत राहते. दुसरीकडे, बाजारात एकरकमी मोठी गुंतवणूक केल्यास भविष्यातील परताव्यांवर मोठा परिणाम करते. यात जोखीमीची मोठी भूमिका असते. एसआयपी असो वा एकरकमी गुंतवणूक, आपल्या पोर्टफोलिओत विविधता असल्यास धोके कमी असतात.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

पनवेल मनपा कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारणी जाहीर – मुकुंद जाधवर

Next Post

सचिन वाझेंना 10 दिवसांची कोठडी, NIAने केली होती चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी

Next Post

सचिन वाझेंना 10 दिवसांची कोठडी, NIAने केली होती चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करा, प्रशासन अलर्ट करा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

April 12, 2021

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली गुंफणार हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प

April 12, 2021

उत्तमरांव आढाव यांचे दुःखद निधन

April 12, 2021

आढाव कुटुंबातील तेजस्वी तारा निखळला!

April 12, 2021

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

April 12, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार – पालकमंत्री जयंत पाटील

April 11, 2021

कोरोनावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक : केंद्रीय पथकाचे मत

April 11, 2021

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे

April 11, 2021

फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा परिणाम

April 11, 2021

Phaltan, Satara : गुढीपाडव्याला आपली आवडती सुझुकी टूव्हीलर आणा घरी ऑफरच्या संगे

April 11, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.