आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर, द्यावं लागणार शुल्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: तुम्ही जर ‘गुगल पे’द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करत असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल पे ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी (Peer to peer payments facility) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर (Instant Money Transfers) पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. ज्याकरता युजर्सना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

मीडिया अहवालांच्या मते सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा देते.

मराठा समाजासाठी मोठी बातमी, शैक्षणिक प्रवेशाबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान गुगलकडून नोटीस जारी होऊन WEB APP बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स 2021 च्या सुरुवातीपासून Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार. याकरता युजर्सना Google Pay चा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे Google कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, Google Pay च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.

Google कडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. Googe कडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. कंपनीने Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.

…तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, काय आहे नवा नियम


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!